Ad will apear here
Next
जगातील सर्वात मोठ्या कर्व्ह मॉनिटरचे उद्घाटन
नवी दिल्ली : सॅमसंग इंडिया या देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वात विश्वासार्ह अशा ग्राहकांच्या इलेक्ट्रॉनिक ब्रँडतर्फे जगातील सर्वात मोठ्या कर्व्ह मॉनिटरचे भारतात उद्घाटन करण्यात आले आहे. ४९ इंची अल्ट्रा वाइड कर्व्ह मॉनिटरमुळे व्यावसायिक आयुष्य अधिक सोपे होईल; तसेच गेम खेळणाऱ्यांसाठीचा अनुभवही उत्साहवर्धक असेल.

४९ इंचाच्या, ३२:९ सुपर अल्ट्रा वाइड कर्व्ह असलेल्या, क्यूएलइडी मॉनिटर म्हणजे आजच्या घडीचा सर्वात रुंद मॉनिटर आहे. यामुळे वापरणाऱ्याला पूर्णपणे बॅझेल फ्री आनंद घेण्याची संधी प्राप्त होते. फ्यूइड आणि फास्ट पेस्ड व्हू फिल्ड, अमर्यादित असा हा या प्रकारातील एकमेव मॉनिटर आहे. सध्याच्या व्यावसायिकांसमोर सकारात्मकता घेऊन उभा ठाकलेला, मोठ्या स्क्रीनचा का मॉनिटर, उत्तम पिक्चरचा दर्जा आणि रेसिजस्टंस बर्नची सुविधा देतो.

‘सॅमसंगने नेहमीच ग्राहकप्रधान नाविन्यपूर्णता सादर केली आहे आणि क्यूएलइडी कर्व्ह मॉनिटर सादर करणे हा आमच्या वचनबद्धतेचाच भाग आहे. मोठे व्यावसायिक आणि गेम खेळणाऱ्यांचा हा सच्चा दोस्त आहे, या प्रकारातील हा सर्वात मोठा मॉनिटर आहे, याशिवाय स्पेसिफिकेशन्स आणि तंत्रज्ञान यातील ट्रेण्ड सेटरही आहे,’ असे सॅमसंग इंडियाचे ग्राहक एंटरप्राइज व्यवसायाचे उपाध्यक्ष पुनित सेठी म्हणाले.  

ते पुढे म्हणाले की, ‘स्क्रीनवर काही पाहण्याचा अनुभव अधिक सुखकारक करण्यासाठी, मॉनिटर आय सेव्हर मोड आणि फ्लिकर फ्री तंत्रज्ञानाचा वापर करते. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो. आजच्या घडीला काम करणारा प्रत्येकजण अनेक तास स्क्रीनसमोर घालवतो. त्यासाठी ही सुविधा उपयुक्त आहे. मॉनिटरच्या आय सेव्हर मोड ऑबस्ट्रॅक्ट लाइट वेवलेंथमुळे रेटिनाला अधिक आराम मिळतो आणि रंगांमुळे डोळ्यांना होणारा त्रास टाळता येतो.’

‘इजी सेटिंग बॉक्स एस-डब्ल्यू’ या अॅप्लिकेशनमुळे डेस्कटॉपवर काम करणाऱ्यांना विविध आकाराच्या आणि कामांच्या गरजेनुसार अधिक चांगल्या मल्टिटास्किंगसाठी पार्टिशन वापरता येते. याशिवाय यात जलद, फायनर कंट्रोल आणि विविध इनपुट पोर्ट्स यासारख्या वैशिष्ट्यांमुळे उपकरणाशी अगदी सुलभतेने जोडता येते.

यातील क्वांटम डॉट टेक्नोलॉजीमुळे मॉनिटरचा अनुभव उजेडाची परिणामकारकता, स्थिरता आणि विस्तारित रंगसंगती यामध्ये अत्याधुनिकता देते. नव्या मेटल अलॉय क्वांटम डॉट्स, क्यूएलइडी मॉनिटर अॅड्रेस या सर्व प्रमुख पिक्चर क्वालिटीच्या घटकांची पिक्चर क्वालिटी, रंगसंगती, प्रखरता, बोल्ड कॉण्ट्रास्ट आणि व्ह्यूइंग एंजल यांचाही समावेश आहे.

मॉनिटरमध्ये हाय डायनॅमिक रेंज (एचडीआर)च्या तंत्रज्ञानाच्या पॅकमध्ये उत्तम काँट्रास्ट, स्पेक्टॅक्युलर डेप्थ आणि रंगांची श्रेणी याद्वारे कमी उजेडातील भागांत किंवा काळोख्या भागातही स्क्रीनवर उत्तम दिसू शकते. याशिवाय मोशन पिक्चर्सला कमी इनपुट लेगसाठी चांगला प्रतिसाद मिळतो. स्क्रीन कमांड्सला कसा प्रतिसाद देते यावर ते अवलंबून आहे. यामुळे तुमच्या डोळ्यावर ताण येत नाही आणि घोस्टिंगलाही आळा बसतो.

हा मॉनिटर एक लाख ५० हजार रुपयांमध्ये सॅमसंगच्या दुकानांत उपलब्ध आहे आणि लवकरत तो रिटेल आउटलेटमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZSABJ
Similar Posts
भारतातील सिनेमा थिएटरला नवा आयाम नवी दिल्ली : ग्राहकांना नाविन्यपूर्ण व सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सॅमसंग इंडिया या देशातील सर्वात विश्वासार्ह कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने जगातील पहिला ऑनिक्स सिनेमा एलईडी स्क्रीन भारतात आणून सिनेमा पाहण्याच्या पद्धतीला नवा आयाम दिला आहे.
‘सॅमसंग’ दाखवणार भारतातील फाइव्ह-जी दुनियेची झलक नवी दिल्ली : येथे होत असलेल्या ‘इंडियन मोबाइल काँग्रेस २०१८’मध्ये सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी भारतातील फाइव्ह-जीचे भविष्य दर्शवणार आहे. देशभरातील लोकांवर विविध मार्गांनी फाइव्ह-जीचा कशाप्रकारे परिणाम होईल आणि घर, मैदाने, रस्ते व शेतावरील लोकांचे डिजिटल आयुष्य ‘सॅमसंग’च्या सेवांद्वारे कशाप्रकारे उंचावेल हे कंपनी या वेळेस स्पष्ट करणार आहे
सॅमसंगच्या ‘गॅलेक्सी ऑन७’चे अनावरण नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा आणि विश्वासार्ह स्मार्टफोनचा ब्रँड सॅमसंग इंडियाने गॅलेक्सी ऑन७ प्राइमचे १७ जानेवारीला उद्घाटन केले. चांगली रचना आणि कामगिरीतील विस्तारामुळे अधिक ‘स्मार्टर लाइफ’साठी हा फोन अत्यंत उपयुक्त आहे.
‘सॅमसंग’चे ‘एस९ प्लस’ आणि ‘नोट ९’ नव्या रंगात गुरुग्राम : भारतातील सर्वात विश्वासार्ह स्मार्टफोन ब्रँड असलेल्या ‘सॅमसंग’ने ‘गॅलेक्सी एस९ प्लस’ आणि ‘गॅलेक्सी नोट९’ हे आपले दोन प्रमुख फोन सणासुदीच्या काळासाठी गडद नव्या रंगात उपलब्ध केले आहेत. ‘एस९ प्लस’ लक्षवेधक बरगंडी रेड रंगात, तर ‘नोट ९’ अभिजात लॅव्हेंडर पर्पल रंगात उपलब्ध करण्यात आले आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language